बियांनो दम धरा
पडलेल्या बियांनो उगवण्याची करू नका घाई
हा पाऊस आहे अवकाळी तुमच्या उपयोगाचा नाही
आलंय वादळ तौते घालतंय थैमान
डोकं बाहेर नाही काढायचं पडून राहायचं गुमान
हा कसला पाऊस, हा तर पाण्याचा प्रपात !
आला तसा निघून जाईल करून भुई सपाट
ऊन पुन्हा तावणार आहे माती जाईल वाळून
वरून आग बरसेल अन कोंब जातील जळून
अजून थोडा दम धरा फाजील उत्सुकता आवरा
थोड्याच दिवसांनी येणार आहे पावसाळी पाऊस खरा
-सुरेश गोपाळ भागवत (१७/५/२०२१)
(२०२१ साली अरबी समुद्रात आलेल्या वादळाला म्यांमार देशाने तौते (एक प्रकारचा सरडा) असे नाव दिले होते.