बळ अंगी येऊ दे

प्रत्यक्ष दीस म्हणू कसा तुला
माझ्या सीमांची जाणीव आिे मला।
डोळे दिपवतो सूर्य माझे
सहन होईल कसे तेज तुझे॥ १॥

अति अरुंद माझी नजर
विराट तू डोळ्यांत कसा मावणार।
दृष्टी माझी अपुरी पाहायला अणूरेणू
सूक्ष्माहून सूक्ष्म तू पुरेसे भिंग कुठून आणू॥ २॥

न दिसते ते असते न असते ते दिसते
भ्रम आणि वास्तव मला कुठे उमजते।
माझ्या सीमांची जाणीव तुलाही आहे
म्हणूनच का सर्वत्र विखरून राहिला आहेस?॥ ३॥

तुझ्या रूपाची साक्ष जीव-जीवाणू
जसे तुषारांतुन दिसते इंद्रधनू ।
वाऱ्याच्या झुळकेत अन् फुलांच्या सुवासात
तूच तर दडला आहेस सौम्य स्वरूपात॥ ४॥

ममतेचे पाझर, कल्पनेची फेक
प्रतिभेचा आविष्कार तुझ्या चैतन्याची झाक।
जरी भासत राहतोस साऱ्या आसमंतातून
जसा गंधार उमटे सुरेल तंबोऱ्यातून ॥ ५॥

एक मागणे मागतो मला नि:सीम होऊ दे
तुला प्रत्यक्ष पाहण्या बळ अंगी येऊ दे।

Similar Posts

  • पुढे कसे जाणार ?

    पुढे कसे जाणार ? काळ पुढे जातो, वय पुढे जाते आपणही तेच करायचे आहे भूतकाळात न अडकता प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II डोळे समोर आहेत त्यातून धडा घ्यायचा आहे जमेल त्या मार्गाने पुढे काय याचा...
  • बियांनो दम धरा

    बियांनो दम धरा पडलेल्या बियांनो उगवण्याची करू नका घाई हा पाऊस आहे अवकाळी तुमच्या उपयोगाचा नाही आलंय वादळ तौते घालतंय थैमान डोकं बाहेर नाही काढायचं पडून राहायचं गुमान हा कसला पाऊस, हा तर पाण्याचा प्रपात...
  • किमया

    किमया वैशाखातील संध्या होती संधिप्रकाश विरत होता मावळतीवर खिन्न लालिमा विझण्या आधी रेंगाळत होता II१II क्षितिजावरचा निरोप सोहळा मेघांनी आच्छादित होता मावळतीला धीर द्यावया शुक्र पिवळसर तेवत होता II२II दूर उभ्या त्या वृक्ष-तरूंच्या गर्द, स्तब्ध...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *