सरत चालली गोडी पेढ्याची
कडसर झाली चव दुधाची
रुक्ष वाटते नवनीत  अन
तीक्ष्ण भासते धार तुपाची    II१II

भेसळ नैवेद्यात झाली
पावित्र्य हरवले प्रसादाचे
पैसा वरचढ आस्थेला
धिंडवडे भक्ती भावनेचे    II२II

चिंतीत गाय  दत्तगुरूंची
आणि गोधन श्रीकृष्णाचे
नाराज महिष यमराजाचा
मन उदास पशुपतीच्या नंदीचे   II३II

पशुपालन म्हणती तयाला
हा तर संस्कृतीचा गो वेद
जोवर नाही सन्मान तयाचा
गोमाता निरर्थक शब्द          II४II

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *