नववर्ष २०२१

नवं वर्ष येतं आहे
त्याशी नातं जोडा
काय होणार, कसं होणार
याची काळजी सोडा II१II

कोविड साथ शमते आहे
मेंदूचा लॉकडाउन काढा
हे नाही, ते नाही
वाचू नका पाढा II२II

नको वांगी पुराणातली
नाही नाकानं सोलायचा कांदा
हे आम्ही आधीच केलं होतं
म्हणायचं नाही यंदा II३II

खरी शर्यत लावायचीआहे
दुनियेच्या बरोबर
अद्ययावत व्हायचं आहे
मिळवायचाय पहिला नंबर II४II

आलास टाका मरगळ झटका
सांधे, स्नायू सक्रिय करा
फेका कल्पना भविष्यात दूरवर
विचार चक्रं फिरवा भराभरा II५II

२०२१ हा कोरा चेक आहे
रक्कम आणि नांव आपण टाकायचं आहे
मात्र हे सगळं करताना
साबण आणि मास्क यांचं भान ठेवायचं आहे II६II

– सुरेश गोपाळ भागवत (३०/१२/२०२०)

Similar Posts