ध्येयापायी आयुष्याची कुणी “केली माती”
त्या मातीतून घडली कुठेतरी इवलीशी पणती II१II
परिस्थितीच्या घाण्यामध्ये कुणी रगडले गेले
त्यांच्या रक्त स्वेदाचे जाळाया इंधन झाले II२II
मेहनत करताना कुणाची आतडी पिळवटली
कष्टाचे ते तंतू लपेटून वात की हो वळली II३II
संकटांशी देता टक्कर पडले स्फुल्लिंग
दीप प्रज्वलनासाठी सारा जमलासे योग II४II
ज्यांचे त्यांनी केले, आता तू हो ज्योत दिव्याची
मूकपणे “ते” वाट पाहती इतिकर्तव्यतेची II५II
– सुरेश गोपाळ भागवत (०५/९/२०२४).

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *