खारीचा वाटा
कांही दिवसांपूर्वी माझी कामं आटोपून मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) स्थानकावर पोचलो तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. पनवेलची लोकल फलाटावर उभी होती. गाडी प्रवाशांनी भरली होती आणि तरीही लोक डब्यांमध्ये चढतंच होते, मीही त्यापैकीच...
